नौदलातील शहिदांना आदरांजली
सिल्लोड, (प्रतिनिधी) तिन्ही दलापैकी एक असलेल्या नौदलात कार्य करत असताना राष्ट्रासाठी कामी आलेल्यानचे स्मरण अभिवादन तर कार्यरत असलेल्या सैनिकांचा आदर करणे म्हणजे नौदल दीन साजरा करणे असल्याचे मत रोहिणी खांदवे यांनी केले.
अशोक गरुड शैक्षणिक समूहाचे ज्ञानविकास विद्यालय भराडी येथे नौदल दिनानिमित्ताने यश अक्कर, भक्ती जाधव, रोहिणी खांदवे आदी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत नौदलात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांविषयी कृतघ्नता व्यक्त केली.